विभागाचा ईमेल :-
सरकारकडून प्राप्त होणारा निधी कोषागारातून काढणे व इतर स्रोतांतून मिळालेल्या निधीचा समावेश करणे.
विभागवार निधीचे वितरण – पंचायत समिती विविध विभागांना त्यांच्या गरजेनुसार निधी वितरित करणे.
आलेख व खर्च नोंदी – निधी जमा व खर्चाची अचूक नोंद ठेवणे.
विविध योजना निधी वितरण – पंचायत समितीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांनुसार निधीचे वाटप करणे.
निवृत्तीवेतन अदा – सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची प्रक्रिया पार पाडणे.
पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे.
आर्थिक सल्लागार व प्राथमिक लेखापरीक्षक म्हणून काम करणे.
आर्थिक व्यवस्थापन व गुंतवणूक नियंत्रण ठेवणे.
पंचायत समितीचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करून सादर करणे.
संपूर्ण खरेदी व्यवहार विहित पद्धतीने पार पाडणे.
सर्व विभागांचे देयके तपासून खर्चास मंजुरी देणे.
कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व निवृत्तीवेतन अदा करणे.